Animal Farm (Marathi, Paperback, Orwell George)

149.00175.00 (-15%)

80 in stock

जॉर्ज ऑर्वेल या टोपण नावानं विख्यात असणारे एरिक आर्थर ब्लेअर जगातल्या सर्वांत प्रभावशाली कादंबरीकारांपैकी एक समजले जातात. केवळ कादंबरीकारच नव्हे, तर ते एक नामवंत निबंधलेखक, पत्रकार आणि टीकाकारही होते. 20व्या शतकातल्या सर्वश्रेष्ठ इंग्रजी लेखकांमध्ये त्यांच्या नावाचा नेहमीच समावेश केला गेलेला आहे. त्यांनी तयार केलेले अनेक शब्द इंग्रजी भाषेत आता रूढ झालेले आहेत आणि प्रत्येकाच्या शब्दसंपत्तीचा ते भागच बनून गेलेले आहेत.

Compare
SKU: 9789355430656 Category:

जॉर्ज ऑर्वेल यांची रूपकात्मक उपहासगर्भ कादंबरी म्हणजे अ‍ॅनिमल फार्म. सन 1945मध्ये प्रथम प्रकाशित झालेली ही कादंबरी म्हणजे 1917 सालातल्या रशियन क्रांतीच्या सत्तासंघर्षाचं आणि त्यानंतर आलेल्या स्टॅलिनच्या दडपशाही कालखंडाचं प्रतीक आहे. जोसेफ स्टॅलिन आणि रशियावरच्या त्याच्या निरंकुश हुकूमशाहीवर निग्रहाने व उघड टीका करणार्‍या ऑर्वेलने ही कादंबरी राजकीय आणि कलात्मक हेतू एकत्र गुंफण्याच्या हेतूने लिहिली. सत्ता आणि भ्रष्टाचार यांच्या हव्यासातून आदर्शवादाला फशी पाडता येतं, हे या अतिशय सोप्या भाषेत लिहिलेल्या पण अंगावर येणार्‍या, कालातीत अभिजात कादंबरीतून प्रत्ययाला येतं.

Additional information

language

Marathi

Be the first to review “Animal Farm (Marathi, Paperback, Orwell George)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Reviews

There are no reviews yet.

ApnaBazar