Manjul The Liberation Of Sita

199.00225.00 (-12%)

5 in stock

वोल्गा यांची जवळपास पन्नास पुस्तकं प्रकाशित झाली असून, त्यात कांदबर्‍या, नाटकं, कथासंग्रह, निबंध, कविता आणि अनुवाद यांचा समावेश आहे. अस्मिता रिसर्च सेंटर फॉर वुमेन या संस्थेच्या संस्थापिका सदस्य असलेल्या वोल्गा या सध्या या संस्थेच्या ‘एक्सिक्युटिव्ह चेअरपर्सन’ आहेत. वोल्गा यांना आजवर अनेक पुरस्कार देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आलेला आहे. त्यात ‘सर्वोत्कृष्ट लेखिका’ म्हणून पोट्टी श्रीरामलू तेलगू विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पुरस्काराचाही समावेश आहे.

 

  • Language: Marathi
  • Binding: Paperback
  • Publisher: Manjul Publishing House
  • Genre: Fiction
  • ISBN: 9789390924332
  • Pages: 124
Compare
SKU: 9789390924332 Category:

या पुस्तकातून वोल्गा आपल्याला सीतेची गाथा सांगतात. पुरुषोत्तम रामाने त्यागलेल्या पत्नीची कथा आहे ही. यातून आत्माविष्काराच्या विलक्षण कष्टप्रद मार्गावर झालेली तिची वाटचाल आपल्या समोर येते. अडवणूक करणार्‍या प्रत्येक बंधनातून स्वतःला मुक्त करणार्‍या इतर काही अलौकिक स्त्रियांना ती या वाटेवर भेटते. एका अनपेक्षित निग्रहाच्या दिशेने त्या सीतेला घेऊन जातात. त्या दरम्यान, अयोध्येचा आदर्श राजा राम आणि आपल्या पत्नीवर प्रेम करणारा निष्ठावंत पती या दोन भूमिकांचा पुनर्विचार करण्याची वेळ रामावरसुद्धा येते. आपलं जीवन आणि अनुभव यांकडे नव्या दृष्टीने बघण्याची ताकद स्त्रियांना या पुस्तकातून निश्चितच मिळते. हे पुस्तक म्हणजे स्त्रीवाद पुरस्कृत करताना वोल्गा यांच्याकडून आकाराला आलेली अप्रतिम गुंफण आहे.

Additional information

Weight 0.4 kg
Dimensions 20 × 12 × 5 cm
brand

Natham publication

Genre

Fiction

Binding

Paperback

language

Marathi

ApnaBazar