The Happiest Man On Earth (Marathi) (Paperback, Manjul Publishing House)

275.00299.00 (-8%)

In stock

1920 मध्ये जर्मनीत एडी जाकु जअच याचा जन्म झाला, तेव्हा त्याचं नाव होतं अब्राहम जाकुबोवीक्झ. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात एडीला अटक झाली आणि त्याला बुखेनवाल्ड आणि आउश्वित्झ येथील छळछावण्यात पाठवलं गेलं. 1945मध्ये त्याला एका यात्रेला पाठवलं गेलं - ती यात्रा होती मृत्यूची. अखेर दोस्तांच्या सैन्याने त्याची सुटका केली. 1950मध्ये तो आपल्या कुटुंबासह ऑस्ट्रेलियात जाऊन तिथे स्थायिक झाला. तेव्हापासून तो तिथेच राहतो आहे. 1992 साली सिडनी ज्युईश म्युझियम स्थापन झाले तेव्हापासून तो तिथे स्वयंसेवी वृत्तीने कार्यरत आहे.

Compare
SKU: 9789391242909 Category:

एडी जाकु हा स्वतःला नेहमीच प्रथम जर्मन आणि नंतर ज्यू समजत असे. त्याला जर्मनीचा विलक्षण अभिमान होता; पण नोव्हेंबर 1938मध्ये त्याला झोडपलं गेलं, त्याला अटक करून छळछावणीत त्याची रवानगी झाली आणि त्याला जर्मनीचा वाटणारा अभिमान हा भूतकाळ झाला. त्याच्या पुढच्या सात वर्षांत, कल्पना करता येणार नाही असे भयकारी प्रसंग त्याच्यावर ओढवले; प्रथम बुखेनवाल्डमध्ये आणि नंतर आउश्वित्झमध्ये मृत्युयात्रेची वाट चालत असताना तो आपल्या कुटुंबाला मुकला, त्याचे मित्र त्याने गमावले आणि अखेर त्याचा देशही त्याचा उरला नाही. प्रसंगी हृदय विदीर्ण करणारी, तरीही अत्यंत समर्थ आणि आशादायक अशी ही स्मृतिकहाणी आहे. ‘भोवती अथांग काळोख दाटला असला तरी आनंद शोधता आणि मिळवता येतो’ हाच या प्रेरणादायी जीवनकथेचा संदेश आहे.

Additional information

Weight 0.4 kg
Dimensions 20 × 12 × 5 cm
language

Marathi

ApnaBazar