The Four Sacred Secrets (Marathi, Paperback, unknown)
₹299.00₹399.00 (-25%)
प्रीताजी - मानवी जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणारं नेतृत्वशील व्यक्तिमत्त्व. मानवी चेतनेचं विकसन करण्यासाठी तत्त्वज्ञानाचं आणि ध्यानाचं प्रशिक्षण देणार्या ‘ओ अॅण्ड ओ’ अॅकॅडमीच्या त्या सहसंस्थापिका आहेत. संपूर्ण जगभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये त्या प्रशिक्षण वर्ग घेतात, त्यामुळे चेतनेच्याशास्त्रीय आणि अलौकिक मितीकडे लोक अग्रेसर होतात. त्यांचं ‘हाऊ टू एंड स्ट्रेस, अनहॅप्पिनेस अॅण्ड अँक्झायटी टू लिव्ह इन अ ब्यूटिफुल स्टेट’ हे टेडएक्सवरील मार्गदर्शन आजपर्यंत वीस लाखांपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचले आहे.
कृष्णाजी - मानवी जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणारं नेतृत्वशील व्यक्तिमत्त्व, तसेच ते ‘ओ अॅण्ड ओ’ अॅकॅडमीचे सहसंस्थापक आहेत. ते जागतिक स्तरावरील अनेक नेत्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत. त्यांनी त्यांची पत्नी प्रीताजी आणि कन्या लोका यांच्यासह दोन कल्याणकारी संस्थांची स्थापना केली आहे. ‘वर्ल्ड युथ चेंज मेकर्स’ ही संस्था युवा नेत्यांसाठी काम करते, तर ‘वन ह्युमॅनिटी केअर’ ही संस्था भारतातील त्यांच्या अॅकॅडमीच्या परिसरात असणार्या ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचं कार्य करते.
जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणार्या या पुस्तकातून प्रीताजी आणि कृष्णाजी सजगतेनं संपत्तीची निर्मिती, जोडीदारासोबत प्रेमपूर्ण नातं आणि स्वतःच्या आंतरिक शांतीचा शोध या विषयांवर प्रकाश टाकतात. ते आपल्याला साध्या व परिणामकारक ध्यानपद्धती, हसत-खेळत शिकवण्यात येणारे धडे आणि अत्यंत प्रभावी अंतर्दृष्टी देऊन आपल्या चेतनेत परिवर्तन घडवतात, त्यामुळेच आपली स्वप्नं सत्यात उतरतात. एक अतिशय सुंदर जीवन जगण्यापासून तुम्ही फक्त चार पायर्या दूर आहात, यासंबंधी हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरेल.
Additional information
Weight | 0.24 kg |
---|---|
Dimensions | 20 × 12 × 2 cm |
language | Marathi |
Reviews
There are no reviews yet.